Thursday 19 September 2019

उपक्रम- रांगोळीतून गुणवत्ता संवर्धनाकडे

रांगोळी रेखाटनाकडून गुणवत्ता संवर्धनाकडे

जि.प.शाळा,बंधारफळी(रायंगण)
ता.नवापूर जि.नंदुरबार
माझी शाळा माझे उपक्रम-

माझ्या ११ नक्षत्रांसह मी

मुलांची गरज लक्षात घेता पारंपारिक पध्दतीपेक्षा आकर्षण वाढविणारा उपक्रम-

मला जी गोष्ट मुलांकडून साध्य करून घेणे कठीण जात होते,ते या उपक्रमामुळे सहज शक्य होत आहे.

मुलं अगदी आवडीने चित्र व त्याचे इंग्रजीच्या नावाचे स्पेलिंग लक्षात ठेवत आहेत.

त्याच बरोबर खालच्या वर्गासाठी मराठीतील चित्र व शब्द वाचन हा घटक देखिल मला उत्तम प्रकारे प्रतिसाद देवून जात आहे.

मला हा उपक्रम शक्य होईल ते चित्र घेवून अविरतपणे सुरू ठेवावयाचा आहे.

सौ.जया नेरे(प्राथ.शिक्षिका)
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

Wednesday 18 September 2019

फुलपाखरांची शाळा

माझी कविता-
फुलपाखरांची शाळा-
आज दि-18/09/2019 च्या "दै.दिव्य मराठी" या वृत्तपत्रातील
"किड्स कॉर्नर" या सदरात प्रकाशित...
संपादकसो यांचे मनस्वी आभार...
आदरणिय श्री.दासू भगत सर यांचे मनस्वी आभार...

Saturday 14 September 2019

माझी काव्य रचना



आमच्या गावाकडे

आमच्या गावाकडे
आताशा कुठे हिरवी हिरवी
कुरणे बघायला मिळतात?
तिथे ही बरसत नाही
अलिकडे पाऊस
आणि नाही कुणाला शेतीची हौस
ओसाड भकास माळरान सारे
धावताय पोटापाण्यासाठी
शहराकडे
आमच्या गावाकडे
खळखळ वाहणारे नदीनाले
राहिलेत कुठे
आटलीत सारी राहिलेत कुठे
पाणवठे
दिसत नाही कोणी नदीत
पोहतांना
नदीकिनारी मुलं दिसतात कुठे
खेळतांना
नसते तिकडे बायकांची लगबग
घराच्या ओढीने चालण्यात येणारा
वेग
देवळात हल्ली शुकशुकाट असतोय
आरतीच्या वेळी सारा गलका
टिव्ही समोर दिसतोय
निसर्गाप्रमाणे माणसांची
मनेही सुकलीत
भविष्याच्या चिंतेने ती आता
सारीच वाकलीत
निसर्गाचा कोप माणसाला
गिळू पहातोय
गावच्या गाव ओस पाडतोय
म्हातारे कोतारे फक्त ओसरीवर
दिसतात
शेवटचे आपले क्षण बोटावर
मोजतात
थकलेत ते ही सुरुकुतल्या शरिराचे
ओझे झेलतांना
गावाकडची सारी जबाबदारी नेटाने
पेलतांना
आमच्या गावाकडे....

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363


Thursday 12 September 2019

माझी काव्य रचना

सांग ना बाप्पा
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?
होऊन पावसाच्या सरी
हवे तिथे हवे तसे तरी
पडशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

कुठे अति बरसतोय
कुठे मात्र पाठ फिरवतोय
या ना त्या कारणाने
दुष्काळाचे सावट पसरवतोय
बाल बच्च्यांच्या मुखात
चटणी भाकरीचा घास तरी
देशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढं तरी करशील का?

या ना त्या कारणाने
जातोय प्रत्येकाचा जीव
कुठे अपघात तर
कुठे आत्महत्त्येचे प्रमाण वाढलयं
हे सारे तू विविध रूपाने येवून
आटोक्यात आणशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

बाप्पा खालावत चालली
मुल्य जीवनातील
जो तो करतोय अरे रावी
ना वयाचे जाण ना
स्त्रियांचा मान
प्रत्येकाचे मन संस्काराने
भरशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

प्रदुषणांनी गजबजलेय
गाव शहर वस्ती सारे
वाहत नाही कुठेच
मोकळे शुद्ध वारे
यासाठी वृक्षलागवडीचे
भान सा-यांना देशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

नोकरी अभावी नवयुवकांची
गळचेपी होतेय
शिक्षण घेऊन बेकारीचे
जीवन जगतोय
नैराश्येने हतबल होऊन
शरीर गमावून बसतोय
सुदृढ सकस शरीरयष्टीचा
ध्यास पुन्हा देशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

सौ.जया नेरे
नवापूर
9423918363




Monday 9 September 2019

शाळा सुरू झाली.
विद्यार्थ्यांना साधे प्रथम नावाचे ओळख पत्र करून देण्यात आले.
या मागे दोन उद्देश होते.

१)त्यांना स्वतःच्या नावापासून वाचनाकडे नेणे.
नावांच्या आकारांची ओळख होणे.
मित्रांची नावे देखिल पाहताच ओळखता येणे.
२) पहाताच विद्यार्थी उपस्थिती लक्षात येणे.
यात "आज मी घरी आहे" हा उपक्रम उपस्थितीसाठी घेण्यात आला.
मुलं शाळेत आली की आपले ओळखपत्र गळ्यात टाकतात.
व जे मुलं घरी आहेत त्यांचे ओळखपत्र तेथेच भिंतीवर टांगलेले असते.म्हणजे तो आज घरी आहे असे कार्ड रूपात जणू आपल्याला सांगत असतो..




शनिवारीय कवायत


शनिवारीय कवायत-
माझ्या११ नक्षत्रांसह
१५ अॉगस्टला विद्यार्थ्यांना ट्रॕकसुट वाटप करण्यात आले होते.
परंतु काही ना काही कारणास्तव शनिवारी शाळेला सुटी असायची.
परंतु आज तर सर्व मुलं अगदी उत्साहात ड्रेस घालून आली व मला दाखवत होते.
छान दिसायची आज माझी पाखरं
हा अनुभव त्यांना नवीनच होता.
उभे दोन हात व बैठे दोन हात त्यांच्याकडून करवून घेण्यात आली...त्यांना ही कृती आनंद देवून गेली.

सौ.जया नेरे
नवापूर
जि.प.शाळा,बंधारफळी(रायंगण) ता.नवापूर जि.नंदुरबार
*५ सप्टेंबर २०१९*
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस
शिक्षकदिन
अनुशासन दिन म्हणून
*माझ्या ११नक्षत्रांसह उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला*
विद्यार्थी आज शिक्षकाच्या भुमिकेत होते.
दैनंदिन अनुकरणाप्रमाणे त्यांनी आजचे कामकाज सांभाळले.
त्यांच्या मनोगतातून आज ही भुमिका साकारतांना त्यांना खूप आनंद वाटला.
इतर विद्यार्थ्यांनी आजच्या शिक्षकांचा गुलाबपुष्प देवून सन्मान केला...
शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी नेहमी आदर्श  असतो...
विद्यार्थ्यांनी शाळेत आल्या आल्याच आपल्या मॕडमांचा गुलाबपुष्प देवून आशीर्वाद घेतला.

मिष्टान्न भोजनासह शेवट गोड करण्यात आला.

सौ.जया नेरे
नवापूर