Thursday 19 September 2019

उपक्रम- रांगोळीतून गुणवत्ता संवर्धनाकडे

रांगोळी रेखाटनाकडून गुणवत्ता संवर्धनाकडे

जि.प.शाळा,बंधारफळी(रायंगण)
ता.नवापूर जि.नंदुरबार
माझी शाळा माझे उपक्रम-

माझ्या ११ नक्षत्रांसह मी

मुलांची गरज लक्षात घेता पारंपारिक पध्दतीपेक्षा आकर्षण वाढविणारा उपक्रम-

मला जी गोष्ट मुलांकडून साध्य करून घेणे कठीण जात होते,ते या उपक्रमामुळे सहज शक्य होत आहे.

मुलं अगदी आवडीने चित्र व त्याचे इंग्रजीच्या नावाचे स्पेलिंग लक्षात ठेवत आहेत.

त्याच बरोबर खालच्या वर्गासाठी मराठीतील चित्र व शब्द वाचन हा घटक देखिल मला उत्तम प्रकारे प्रतिसाद देवून जात आहे.

मला हा उपक्रम शक्य होईल ते चित्र घेवून अविरतपणे सुरू ठेवावयाचा आहे.

सौ.जया नेरे(प्राथ.शिक्षिका)
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

Wednesday 18 September 2019

फुलपाखरांची शाळा

माझी कविता-
फुलपाखरांची शाळा-
आज दि-18/09/2019 च्या "दै.दिव्य मराठी" या वृत्तपत्रातील
"किड्स कॉर्नर" या सदरात प्रकाशित...
संपादकसो यांचे मनस्वी आभार...
आदरणिय श्री.दासू भगत सर यांचे मनस्वी आभार...

Saturday 14 September 2019

माझी काव्य रचना



आमच्या गावाकडे

आमच्या गावाकडे
आताशा कुठे हिरवी हिरवी
कुरणे बघायला मिळतात?
तिथे ही बरसत नाही
अलिकडे पाऊस
आणि नाही कुणाला शेतीची हौस
ओसाड भकास माळरान सारे
धावताय पोटापाण्यासाठी
शहराकडे
आमच्या गावाकडे
खळखळ वाहणारे नदीनाले
राहिलेत कुठे
आटलीत सारी राहिलेत कुठे
पाणवठे
दिसत नाही कोणी नदीत
पोहतांना
नदीकिनारी मुलं दिसतात कुठे
खेळतांना
नसते तिकडे बायकांची लगबग
घराच्या ओढीने चालण्यात येणारा
वेग
देवळात हल्ली शुकशुकाट असतोय
आरतीच्या वेळी सारा गलका
टिव्ही समोर दिसतोय
निसर्गाप्रमाणे माणसांची
मनेही सुकलीत
भविष्याच्या चिंतेने ती आता
सारीच वाकलीत
निसर्गाचा कोप माणसाला
गिळू पहातोय
गावच्या गाव ओस पाडतोय
म्हातारे कोतारे फक्त ओसरीवर
दिसतात
शेवटचे आपले क्षण बोटावर
मोजतात
थकलेत ते ही सुरुकुतल्या शरिराचे
ओझे झेलतांना
गावाकडची सारी जबाबदारी नेटाने
पेलतांना
आमच्या गावाकडे....

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363


Thursday 12 September 2019

माझी काव्य रचना

सांग ना बाप्पा
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?
होऊन पावसाच्या सरी
हवे तिथे हवे तसे तरी
पडशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

कुठे अति बरसतोय
कुठे मात्र पाठ फिरवतोय
या ना त्या कारणाने
दुष्काळाचे सावट पसरवतोय
बाल बच्च्यांच्या मुखात
चटणी भाकरीचा घास तरी
देशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढं तरी करशील का?

या ना त्या कारणाने
जातोय प्रत्येकाचा जीव
कुठे अपघात तर
कुठे आत्महत्त्येचे प्रमाण वाढलयं
हे सारे तू विविध रूपाने येवून
आटोक्यात आणशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

बाप्पा खालावत चालली
मुल्य जीवनातील
जो तो करतोय अरे रावी
ना वयाचे जाण ना
स्त्रियांचा मान
प्रत्येकाचे मन संस्काराने
भरशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

प्रदुषणांनी गजबजलेय
गाव शहर वस्ती सारे
वाहत नाही कुठेच
मोकळे शुद्ध वारे
यासाठी वृक्षलागवडीचे
भान सा-यांना देशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

नोकरी अभावी नवयुवकांची
गळचेपी होतेय
शिक्षण घेऊन बेकारीचे
जीवन जगतोय
नैराश्येने हतबल होऊन
शरीर गमावून बसतोय
सुदृढ सकस शरीरयष्टीचा
ध्यास पुन्हा देशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

सौ.जया नेरे
नवापूर
9423918363




Monday 9 September 2019

शाळा सुरू झाली.
विद्यार्थ्यांना साधे प्रथम नावाचे ओळख पत्र करून देण्यात आले.
या मागे दोन उद्देश होते.

१)त्यांना स्वतःच्या नावापासून वाचनाकडे नेणे.
नावांच्या आकारांची ओळख होणे.
मित्रांची नावे देखिल पाहताच ओळखता येणे.
२) पहाताच विद्यार्थी उपस्थिती लक्षात येणे.
यात "आज मी घरी आहे" हा उपक्रम उपस्थितीसाठी घेण्यात आला.
मुलं शाळेत आली की आपले ओळखपत्र गळ्यात टाकतात.
व जे मुलं घरी आहेत त्यांचे ओळखपत्र तेथेच भिंतीवर टांगलेले असते.म्हणजे तो आज घरी आहे असे कार्ड रूपात जणू आपल्याला सांगत असतो..




शनिवारीय कवायत


शनिवारीय कवायत-
माझ्या११ नक्षत्रांसह
१५ अॉगस्टला विद्यार्थ्यांना ट्रॕकसुट वाटप करण्यात आले होते.
परंतु काही ना काही कारणास्तव शनिवारी शाळेला सुटी असायची.
परंतु आज तर सर्व मुलं अगदी उत्साहात ड्रेस घालून आली व मला दाखवत होते.
छान दिसायची आज माझी पाखरं
हा अनुभव त्यांना नवीनच होता.
उभे दोन हात व बैठे दोन हात त्यांच्याकडून करवून घेण्यात आली...त्यांना ही कृती आनंद देवून गेली.

सौ.जया नेरे
नवापूर
जि.प.शाळा,बंधारफळी(रायंगण) ता.नवापूर जि.नंदुरबार
*५ सप्टेंबर २०१९*
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस
शिक्षकदिन
अनुशासन दिन म्हणून
*माझ्या ११नक्षत्रांसह उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला*
विद्यार्थी आज शिक्षकाच्या भुमिकेत होते.
दैनंदिन अनुकरणाप्रमाणे त्यांनी आजचे कामकाज सांभाळले.
त्यांच्या मनोगतातून आज ही भुमिका साकारतांना त्यांना खूप आनंद वाटला.
इतर विद्यार्थ्यांनी आजच्या शिक्षकांचा गुलाबपुष्प देवून सन्मान केला...
शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी नेहमी आदर्श  असतो...
विद्यार्थ्यांनी शाळेत आल्या आल्याच आपल्या मॕडमांचा गुलाबपुष्प देवून आशीर्वाद घेतला.

मिष्टान्न भोजनासह शेवट गोड करण्यात आला.

सौ.जया नेरे
नवापूर

Wednesday 4 September 2019

माझा परिचय

माझा परिचय-

*शैक्षणिक कार्य परिचय-*
*सौ.जया निंबाजी नेरे.*
प्राथमिक शिक्षिका
जि.प.मराठी शाळा-बंधारफळी(रायंगण)
ता.नवापूर जि.नंदुरबार
*जन्मतारीख-* २३/०५/१९६९
*निवास* -नवापुर ता.नवापुर जि.नंदुरबार
*शिक्षण*-डी.एड./बी.एड./एम.एड./एम.ए.(मराठी)
*गायन परिक्षा-मध्यमा प्रथम उत्तीर्ण
*वादन (हार्मोनियम)- प्रवेशिका पूर्ण उत्तीर्ण
*नोकरी सुरुवात-*
खाजगी संस्थेत-आश्रमशाळा-जमाना ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार
१९८८ ते १९९२
*जिल्हापरिषद सेवेत-*
०६/०१/१९९२ पासून
विशेष बाब-आदिवासी भागातील सेवा
***************************
जि.प.केंद्रशाळा,भालेर ता.जि.नंदुरबार येथे-
पैसे रूपात-डिजीटल इंटरअॕक्टिव्हसाठी लोकसहभाग-
171869 /-
वस्तू रूपात-
२०१३-१४
डॉ.डी.एम.पाडवी
डी.वाय.पाटील कॉलेज,नेरुल मुंबई यांचेकडून
एकूण-८५ विद्यार्थ्यांना दप्तर वाटप
श्री गुरूदत्त वाचनालय व ग्रंथालय,भालेर यांचे कडून एस.सी.व एस.टी.संवर्गाच्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप
जि.प.शाळा,बंधारफळी(रायंगण)ता.नवापूर जि.नंदुरबार येथे
मानवाधिकार संघटनेकडून दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप
शालेय व्यवस्थापन समिती,जि.प.शाळा,बंधारफळी (रायंगण) कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप
****************************
*पुरस्कार-*
१)न्यायिक लढा व पत्रकार संघ-चाकण-पुणे-  यांचे मार्फत सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार देवून गौरवण्यात आले...
२)महाराष्ट्र अँडमिन पँनल तंत्रस्नेही दोन दिवशीय कार्यशाळेत -29/05/2017-चांदोरी-नाशिक येथे-
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात करण्यात आला....
३)"विचार विद्यार्थ्यांचे" या राज्यस्तरीय वृत्तपत्र - परंडा यांचे मार्फत परंडा(उस्मानाबाद) येथे काव्यसावित्री पुरस्काराने सन्मानित
४)विश्वशांती सेवाभावी बहुउद्देशिय संस्था-पुणे यांचे कडून "विश्वशांती काव्यगौरव पुरस्कार" देवून सन्मानित
५)श्री.गाडगेमहाराज विचारमंच,ओतूर तर्फे "क्रांतीज्योती सावित्रीबाईफुले काव्यगौरव" पुरस्काराने सन्मानित
*सन्मान-*
१)८ मार्च २०१८ रोजी महिला दिनी-
जि.प.नंदुरबार येथे उपक्रमशिल शिक्षिका म्हणून शिक्षण सभापती सन्मा.हिराबाई पाडवी -जि.प.नंदुरबार यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
२)पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था ,चोपडा मार्फत-साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल सन्मान व सत्कार
३)२ अॉक्टोबर २०१८ रोजी तंबाखूमुक्त अभियानात "तंबाखूमुक्तवर"आधारीत काव्यलेखन व घोषवाक्य लेखना बद्दल तसेच जि.प.केंद्रशाळा,भालेर  तंबाखूमुक्त झाल्याबद्दल मा.मुख्य कार्यकारी अधिकारीसो,डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी साहेब यांच्या प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
वृत्तपत्राने घेतली दखल
*******************************
*साहित्य क्षेत्रात विविध पदावर-
१)काव्यप्रेमी शिक्षकमंच (रजि.)
राज्य कार्यकारणी सदस्य
२)आखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रिडा मंडळ- नंदुरबार जिल्हाध्यक्ष
३)विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था-पुणे अंतर्गत नंदुरबार जिल्हाध्यक्ष
४)अंकुर साहित्य संघ-नंदुरबार जिल्हा कार्यकारणी सदस्य
*****************************
राज्यस्तरीय काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा व काव्यसंमेलनात
अध्यक्ष-
१)श्री गाडगेमहाराज विचार मंच,ओतूर-२ रे राज्यस्तरीय काव्यसंमेलनात -ज्ञानज्योती कविसंमेलन सत्राचे अध्यक्ष स्थान
प्रमुख पाहुणे पद-
१)श्री.मुंगीदेवी माध्यमिक व उच्च माध्य.विद्यालय,मुंगी ता.शेवगाव जि.नगर येथे बाल कवयित्री कु.गीता गरड या विद्यार्थ्यांनीच्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा
२)श्री जी वाचनालय-नंदुरबार येथे दि-१३/११/२०१६ रोजी  बालदिनाच्या पूर्व संध्येला मनोरंजनातून शिक्षण यावर वाचनालयाचे सभासद पालक व पाल्यांना मार्गदर्शनासाठी तसेच प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित, स्व.निर्मित व आवश्यक इतर खेळ साहित्य प्रदर्शन--खेळातून शिक्षण यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले....
३)साई प्रतिष्ठान सेवाभावी संस्था -वडगावशेरी,पुणे येथे काव्य महोत्सव व प्रकाशन सोहळा-२०१७
४)साई प्रतिष्ठान व विश्वशांती सेवाभावी संस्था -पुणे येथे काव्य महोत्सव व प्रकाशन सोहळा-२०१८
५)ग्रंथोत्सव-२०१८-१९ -जि.प.नंदुरबार
खुले काव्य संमेलन- प्रमुख अतिथी
******************************
*सन २०१६-१७ या वर्षी नंदुरबार जिल्हा ग्रंथोत्सवात "खेळातून शिक्षण" या स्टॉलला स्वतःच्या साहित्यासह सहभाग व सादरीकरण-
स्टॉलला मा.श्री.पी.प्रदिप ,जिल्हाधिकारी-नंदुरबार यांची भेट तसेच खेळातून शिक्षण ही संकल्पना जाणून घेतांना
*******************************
प्रकाशित ग्रंथसंपदा-
१)"आनंद झुला"-(बालकाव्य संग्रह)
*२)पणती जपून ठेवा (काव्यसंग्रह)
*३)एक काव्य तुला समर्पित ( काव्यसंग्रह)
*४)माझे संपादन असलेला प्रातिनिधिक कविता संग्रह--"कविता स्वातंत्र्याच्या "
*५)माझे संपादन असलेला अहिराणी बोलीभाषेतील काव्यसंग्रह - "खान्देशनी राणी अहिराणी"
१)सहसंपादक-दिवाळी अंक- "काव्यप्रेमी"
२)सहसंपादक-दिवाळी अंक- "मैफल...सर्वांची...सर्वांसाठी...
-----------------------------------------------------------
तालुकास्तर,
जिल्हास्तर,
राज्य स्तरावरील कविसंमेलनाचे आयोजन करून शिक्षक साहित्यिकांच्या कलेस प्रोत्साहन
विविध वृत्तपत्रांनी घेतली दखल
*विशेष कवीसंमेलन-स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वरील काव्यस्पर्धा व नंदुरबार जिल्हास्तरीय काव्यसंमेलन आयोजनाची जबाबदारी-स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक,मुंबई यांनी दिलेल्या नियोजनानुसार
*विविध वृत्तपत्रांनी घेतली दखल
शारदा बहुउद्देशिय संस्था-नाशिक येथिल काव्यसादरीकरण स्पर्धेत "पणती" या कविता सादरीकरणास द्वितीय क्रमांकाने विजय होवून बक्षिस...
*राज्यभर ३० ते ४० ठिकाणी काव्यसादरीकरण सहभाग
*काव्यलेखन स्पर्धेत सहभाग
*काव्यलेखन स्पर्धेचे परिक्षक
*विविध काव्यप्रकारावर मार्गदर्शक काव्यलेखन उपक्रम
******************************
वृत्तपत्र व नियतकालिक यातील लेख-
लेखन-
*दै.आपला महाराष्ट्र* या वृत्तपत्रात साप्ताहिक "बहर" या सदरात प्रकाशित लेख-
१)रक्षाबंधन या सणा निमित्त -नाते कच्च्या धाग्याचे -लेख
२)दिवाळी सणानिमित्त-
मामाचं गाव कुठ हरवलं
३)*दै.लोकमत-नंदुरबार पुरवणीत "माय ओपिनियन" या सदरात -शै.परिस्थितीवर आधारित लेख- "जडेल नाते प्रभूशी तयाचे"
४)"दिव्य मराठीच्या-किड्स कॉर्नर- पुरवणीत मुल समजून घेतांना यावर आधारीत- "पालकास पत्र" यास प्रसिद्धी
दिवाळी अंक-लेख
३)*रंगतदार*२०१८- बालसाहित्य असलेला दिवाळी अंक- यात
*बालबोध कथा रूपात- "दिपक ज्योती"*
४)काव्यप्रेमी दिवाळी अंक-२०१८
*कथा रूपी लेख*- "पणती जपून ठेवा"
*काव्यसंग्रहास प्रस्तावना लेखन-*
१)*ध्यास व्यसन मुक्तीचा*-संपादक-श्री.संजय भाऊ चौधरी यांचे प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रस्तावना लेखन
२)संपादक-सौ.सरला साळूंखे यांचे *लेखनी सरलाची* या काव्यसंग्रहाचे प्रस्तावना लेखन
दिवाळी अंक- कविता लेखन-
१)*संचार'दिवाळी अंक-२०१७*
यात 'आली दिवाळी' ही अभंग रचना प्रकाशित...
२)*रंगतदार दिवाळी अंक-२०१७* यात...
*आपला महाराष्ट्र* कविता व तिचे  सौ.आशा पाटील,सोलापूर यांनी केलेले रसग्रहण प्रकाशित
*सण हा पोळ्याचा*
*रूप धरेचे*
३)*भुमिका* दिवाळी अंक-२०१८-
*लेक* ही कविता
४)मैफल ...सर्वांची...सर्वांसाठी-दिवाळी अंक-२०१८ यात
*खेळ भातुकलीचा*
*अंभग-विठ्ठल*
५)*विद्यार्थी विचारांचे* दिवाळी अंक-२०१८ यात
१)अभंग रचना- *प्रभूच्या चरणी*
२)बाळ
६)*संचार-* दिवाळी अंक-२०१८- यात
*अशी ही दिवाळी* काव्य रचना
*मासिक*-
१)गुन्हे सर्च मासिक-
कविता-होता मिलन दोघांचे
*समीक्षण-
*१)रंगतदार दिवाळी अंक-२०१७*यात  प्रकाशित साहित्य ...
*समीक्षण--"अक्षरांगण"- संकल्पना-संपादन श्री.आनंद घोडके व सहसंकल्पना राजदत्त रासगोलीकर यांची असलेले शालेय बाल कवींनी लिहिलेल्या काव्यसंग्रहाचे समीक्षण
*जागृतीपर विषयांवर काव्य लेखनास प्रकाशित करून सामाजिक कार्य-*
१)वृक्षलागवड-
"क्षितीज काव्यप्रेमींचे"-प्रातिनिधिक काव्यसंग्रहात- "झाडे लावा" ही कविता प्रकाशित
२) काव्यांगणातील चिवचिवाट*या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात *चिऊताई*ही कविता प्रकाशित...
संपादक -प्रिती माडेकर-काव्यांगण प्रतिष्ठान-यवतमाळ
३)तंबाखूमुक्त-
तंबाखूमुक्त चळवळ एक अभियान- या डॉ. माधव कदम संपादित संग्रहात माझ्याकडे दोन कवितांचा समावेश
४)सलाम मुंबईचे हल्लाबोल या तंबाखूमुक्त या वृत्तपत्रात--"तंबाखूमुक्त" ही जजागृतीपर कविता प्रकाशित
*तसेच माझ्या तंबाखूमुक्तीवरील भारूड रचनेचे मी स्वतः गायन करून अॉडिओ प्रसारीत केले...व
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून सादर केले जनजागृती करून सामाजिक कार्य-
५)पाणी वाचवा-पाणी जिरवा-
भविष्याचा पाणी प्रश्न - यावर आधारित-
"दिव्य मराठी वृत्तपत्राच्या -मधुरिमा पुरवणीत -
*"एकच ठरवा- पाणी जिरवा"* जनजागृती करणारी कविता प्रकाशित
********************************
*विविध शालेय उपक्रमांची वृत्तपत्राने घेतलेली दखल-*
१)जि.प.शाळा,मराठी मुले ता.नवापूर गणवेश वाटप अनोखा उपक्रम
२)बालस्वच्छता अभियान या उपक्रमाची वृत्तपत्राने घेतली दखल
१)दै.देशदुत वृत्तपत्रात- उपक्रम शिक्षिका म्हणून दखल घेण्यात आली.
*जलदिंडीची सकाळ वृत्तपत्राने घेतली दखल
२)लोकमत वृत्तपत्राने घेतलेली दखल-
*वस्तू रूपाने लोकसहभाग मिळवून जि.प.शाळा,भालेर ता.जि.नंदुरबार येथील विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाच्या कार्यक्रमाची वृत्तपत्राने दखल घेतली.
*वृक्षारोपन' या दरवर्षी होणाऱ्या उपक्रमाची दखल वृत्तपत्राने घेतली.
* दै.लोकमत वृत्तपत्रात "वाचन प्रेरणा दिवस" उपक्रमास प्रसिद्धी देण्यात आली.
*दै.लोकमत वृत्तपत्राने "गोवरआणि रूबेला लसीकरणाचे माझ्या जि.प.शाळा,बंधारफळी रायंगण जि.नंदुरबार येथे झालेल्या उद्घाटन व लसीकरणाच्या बातमीस प्रसिद्धी दिली.
*दै.लोकमत मध्ये जि.प.शाळा,बंधारफळी (रांयगण)
ता.नवापूर जि.नंदुरबार येथील गोवर व रुबेला लसीकरण विषयक उपक्रमास दिली प्रसिध्दि...उपक्रमातील नाविन्याची वृत्तपत्र घेत असलेली दखल कार्यास प्रेरणादायी ठरतेय...!
*जनशक्ती*  या वृत्तपत्राने घेतलेली दखल-
*२ अॉक्टोबर*  रोजी नंदुरबार येथे झालेल्या तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत कविता व स्लोगन सहभागा बद्दल मा.जिल्हाधिकारीसो,डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी साहेबांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून झालेल्या सन्मान सोहळ्याच्या बातमीस प्रसिद्धी.
*दै.जनशक्ती* या वृत्तपत्राने *जि.प.शाळा,बंधारफळी(रायंगण) शाळेतील *आकाश कंदिलावर गोवर रुबेला लसीकरणाचे संदेश लिहून जनजागृती * या उपक्रमाची दखल घेतली.
*दै.डहाणू मित्र* वृत्तपत्रात माझी *सण पोळ्याचा*  कविता प्रकाशित...
एवढेच नाहीतर माझ्या शाळेत घेतलेला उपक्रम  *मातीचे बैल*  बनवितांना या उपक्रमाची दखल घेतली...!
*जि.प.केंद्रशाळा,भालेर ता.जि.नंदुरबार येथे
शाळा आकर्षक व अध्यापनास पुरक वातावरण निर्मितीच्या दृष्टीने डिजीटल पेंटिंग स्वखर्चाने करण्यात आली.
तसेच डिजीटल इंटरअँक्टिव्ह शाळा...या साठी स्वतःचे योगदान व एक ते दीड लाख रुपये एवढा लोकसहभाग मिळवला व सर्व सोयींनी युक्त वर्ग निर्मिती केली...
*लोक सहभाग शैक्षणिक साहित्य रूपात-
१)सन्-२०१३ जि.प.शाळा,भालेर येथे डॉ,डी.एम.पाडवी,डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज,नेरूल मुंबई यांचेकडून एकूण- ८५ मुलांना दप्तर वाटप
वृत्तपत्राने घेतली दखल-
२) जि.प.शाळा,भालेर येथे वाचनालय यांचे कडून अनु.जमातीच्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप
वृत्तपत्राने घेतली दखल
३)अपंग दिनी भालेर शाळेतील माझी बहुविकलांग विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याचे वाटप
४)ग्रामपंचायत,भालेर कडून २६ जानेवारी २०१८ ला सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
५)जि.प.शाळा,बंधारफळी(रायंगण)येथे २०१८-१९ शाळेच्या पहिल्या दिवशी मानव अधिकार संघटनेकडून शैक्षणिक साहित्य व दप्तरांचे वाटप
वृत्तपत्राने घेतली दखल
६)जि.प.शाळा,बंधारफळी (रायंगण) सन्-२०१९-२० शाळेच्या पहिल्या दिवशी पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
-----------------------------------------------------------
*शिक्षिका पदावर असतांना विशेष बाबी-*
*पंचायत समिती,नवापूर* जि.नंदुरबार अंतर्गत
*४ वर्ष डि.पी.ई.पी.प्रकल्प*  अंतर्गत महिला संचालिका पदावर,
विविध प्रशिक्षण साधन व्यक्ती,
*महिला मेळावे* - यात
स्री पुरुष समानता,
स्री भ्रृण हत्या,
महिलांचे आरोग्य,
घ्यावयाची काळजी,
महिला संरक्षण कायद्यांची ओळख ,
व्यक्तिमत्त्व विकास,
अत्याचाराविरुद्ध विरोध करण्याचे धाडस...
या बाबींचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले..
*किशोरी मेळावे* -आयोजित करणे
यात शाळाबाह्य मुली शाळेत कशा आकर्षित होतील या दृष्टीने शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यांना सहभागी करुन घेणे.
*किशोरवयीन मुलींना*
मासिक पाळी चक्राविषयी उद्बोधन करणे,
सिडीज दाखविणे,
त्यावेळी घ्यावयाची काळजी,
यात स्वच्छतेची काळजी या विषयी प्रबोधन करण्यात आले.
*किशोरवयीन मुलींना*
संरक्षणाचे धडे,
येणाऱ्या समस्या त्याला तोंड कसे देणे
या विषयी मार्गदर्शन पर मेळावे भरविले..
*बालआनंद मेळावे* -
शाळेत मुलं टिकून रहावे व
शिक्षणात गोडी वाटावी,
शाळेचे आकर्षण वाढावे यासाठी *बालआनंद मेळावे* यांचे आयोजन करण्यात आले...
*बालवाडी वर्गाचे विभागामार्फत १३ दिवसांचे ऐने-दाभोण येथे मा.रमेश पानसे व मा.निलेश निमकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेवून ते नवापूर तालुक्यातील सर्व बालवाडीताईंना देण्याची कार्यवाही यशस्वी पणे पार पाडली.
*डि.पी.ई.पी.अंतर्गत शाळाबाह्य मुलांसाठी सुरु केलेले महात्मा फुले हमी केंद्र वस्ती शाळा यावर नेमलेल्या स्वयंसेवक शिक्षकांना दिर्घ प्रशिक्षण देण्याचे कार्य केले.
*विविध जिल्हास्तरीय,राज्य स्तरीय प्रशिक्षण घेवून साधनव्यक्ती म्हणून काम पाहिले...
*जीवन शाळा* हा मुल्यशिक्षण व जीवन कौशल्यांवर आधारित उपक्रम विविध उच्च प्राथमिक शाळेत जावून दिलेल्या नियोजनानुसार राबविले..
-----------------------------------------------------------
*४ वर्ष सर्वशिक्षाअभियान*
अंतर्गत
*मुलींचे शिक्षण (विषयतज्ज्ञ)* म्हणून काम केले यात
*मुलींची पटनोंदणी,
*मुलींच्या शिक्षणाचा आलेख उंचावणे
*मुलींचा शाळेत प्रवेश,
*उपस्थिती व टिकवणे
या साठी तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन...*
-----------------------------------------------------------
सामाजिक जनजागृतीपर उपक्रम-
*स्वच्छता अभियान* अंतर्गत
चित्र रेखाटन स्पर्धा
वक्तृत्व स्पर्धा
लेखन स्पर्धा
हात धुवा उपक्रमाने स्वच्छतेचे महत्त्व
वैयक्तिक स्वच्छता ,त्याचे महत्त्व
पिण्याच्या स्वच्छ पाण्याचे महत्त्व
होणारे आजार,
घ्यावयाची काळजी
व त्या अंतर्गत विविध उपक्रम घेतलेत..
-----------------------------------------------------------
*तंबाखूमुक्त अभियानातील विविध उपक्रम घेवून ११ निकष पूर्ण केले " तंबाखूमुक्त शाळा-सन्मा.सरपंच श्री.गजानन पाटील व शा.व्य.समिती अध्यक्ष श्री.दिनेश पाटील यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली.
-----------------------------------------------------------
*गोवर व रुबेला अभियान*
या अंतर्गत जागृतीपर कविता लेखन केले..त्यांचे सर्व अधिकारी वर्ग यांनी कौतुक केले...
*प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातावर मेहंदीने घोषवाक्य लिहून प्रचार
वृत्तपत्राने घेतली दखल
-----------------------------------------------------------
राष्ट्रीय कार्य-
साक्षरता अभियानात सक्रिय सहभाग,मार्गदर्शन
जणगणना- या कार्यक्रमात सहभाग
-----------------------------------------------------------
*आजपावेतो शिक्षणक्षेत्रात विविध उपक्रम निर्मिती-व राबवून शैक्षणिक प्रगती वाढविणे*
ज्या ज्या शाळेत होते त्या त्या शाळेत मुलांची गरज ओळखून स्वनिर्मित उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती घडवून आणली.
*शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी इतरही अनेक उपक्रम घेतलेत--
जसे की-
*अक्षर,अंक फुग्याला नेम लावणे
*बादलीत चेंडू टाकणे-यात गणिती क्रियांचे ज्ञान देणे
*मासा गळाला लावणे-अक्षर,शब्द,अंक,संख्या वाचन दृढीकरणासाठी
*१ते १०० अंक तक्त्यावर डायसचा वापर करुन संख्या दृढीकरणासाठी वाचन
*मुळाक्षर तक्त्यावर देखिल डायसचा वापर करुन वाचन दृढीकरण
*चिंचोक्या,पिस्त्याची टरफले यांचा वापर करुन कमी जास्त,गणिती तोंडी क्रिया करणे.
*चित्र व शब्द कार्ड यांपासून विविध कृती करुन घेणे.
*पुस्तकाचे पेज नंबर सांगून पेज काढणे हा उपक्रम यामुळे संख्यांचे दृढीकरण झाले.
*पत्त्यांचा खेळ-*
*विविध शैक्षणिक साहित्य हाताळावयास देवून उदिष्ट साध्य करणे.
*वर्तमान पेपर वाचन- या मुळे बातम्या वाचनाची सवय,परिसरातील घडामोडींची माहिती,बातमी लेखनाचे ज्ञान
*दिलेल्या विषयावर कविता लेखन करणे
*तीन शब्दांवरुन गोष्ट लिहिणे
*संवाद लेखन करणे
*परिसराचा नकाशा करणे
*क्षेत्रभेट देणे
*मुलाखतीचे कौशल्य प्राप्त करणे
*निरीक्षण शक्ती वाढविणे
*सुप्त कलागुणांचा विकास होण्यासाठी कला,कार्यानुभव ,शारिरीक शिक्षणाशी निगडीत उपक्रम राबविणे.*
*सणाचे औचित्य साधून कागदी वस्तू बनविणे
*मातीच्या विविध वस्तू बनविणे..पणती,बैल,गणपती,खेळणी,फळ इ.
*कागद काम यात- होडी विविध प्रकारच्या
आकाश कंदील,
भेटकार्ड
कागदी फुलं
कागदाची चटई या सरखे अनेक
*चॉकलेटच्या टाकाऊ रॕपरपासून फुलं व हार तयार करणे.
*विविध अभियानानुसार चित्र रेखाटन स्पर्धा
*वक्तृत्व स्पर्धा
*लेखन स्पर्धा
*दिवाळी अभ्यासाची स्वतः निर्मिती करुन वाटप करणे
*वाचन प्रेरणा दिना निमित्त गावात बस स्टॉप वर पुस्तक वाचनालय ठेवण्यात आले...
*सहशालेय उपक्रम-*
*उन्हाळ्यात चिमणी व पक्ष्यांसाठी पाण्याच्या बाटल्या कापून पाणी तळ्याची सोय करणे...
*विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरा करणे
*स्वातंत्र्यदिनी,प्रजासत्ताक दिनी वाढदिवस येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्टेजवरच वाढदिवस साजरा करणे
*वृक्षारोपन,वृक्षसंवर्धन
*जागतिक महिलादिन
*भव्य हळदीकुंकू कार्यक्रम,हितगुज मेळावा
*या व अशा अनेक उपक्रमाचे आयोजन केले...*
-----------------------------------------------------------
प्रगत शाळा या साठी विविध उपक्रमांचे आयोजन -
प्रगतशाळेसाठी असणाऱ्या २५ मुद्द्यांची परिपुर्ती शाळेत करण्यात आली ..प्रगत शाळा करण्यात यश ही मिळाले...
ज्ञानरचनावादी शाळा....संपूर्ण अध्यापन याच पध्दतीने
ज्ञानरचनावादी संदर्भात शाळेत,केंद्रात शिक्षकांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन
तसेच whats up व फेसबुकवर विविध शैक्षणिक पोस्ट करुन,अध्यापनाचे विविध
व्हिडिओ,पीपीटी,पीडीएफ,ब्लॉग,युट्युबलिंंक शेअर करुन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
-----------------------------------------------------------
शाळा प्रवेशोत्सव नाविन्यपूर्ण साजरा करण्यात आला...
प्रत्येक दिन विशेष शैक्षणिक जोड देवून साजरा करण्यात आला...
वर्गात विविध स्वनिर्मित उपक्रमांचे सादरीकरण करुन त्यांची निष्पती पडताळून पाहून त्या मार्गदर्शक पोस्ट शेअर केल्यात...
-----------------------------------------------------------
*दिव्य मराठी* या वृत्तपत्रात अनेक शैक्षणिक बालगीतांचे प्रकाशन

*स्थानिक आदिवासी बोलीभाषेतून* शैक्षणिक कवितांचे लेखन
*वृक्षारोपन-वृक्ष संवर्धन व संगोपन
*पाण्याची काटकसर ,बचत
*प्लास्टिक बंदी,
*मातीची गणेश मुर्ती स्थापना,
*घरच्या घरी गणेशाचे विसर्जन
या सारख्या पर्यावरण पुरक उपक्रम या साठी शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे...
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करुन या विषयी जनजागृती करण्याचे कार्य केले...
*गावातील अंगणवाडीताईंना बालवाडी अध्यापनाविषयी मार्गदर्शन करणे.
*डिजीटल ,ज्ञानरचनावादी बालवर्गासाठी पेंटिंगसाठी स्वतः योगदान व मार्गदर्शन प्रोत्साहन,
*भालेर येथील तिघही अंगणवाडी मिळून डिजीटल साठी १५०० रू.ची मदत केली
-----------------------------------------------------------
सौ.जया नेरे
प्राथ.शिक्षिका
जि.प.शाळा,बंधारफळी (रायंगण)
ता.नवापूर जि.नंदुरबार
-----------------------------------------------------------